I खोपोली I संतोषी म्हात्रे I
मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर आजिवली गावच्या हाद्दीत मुंबईकडे जाणारया दिशेने ट्रेलर आणि ओम्नी कारचा भीषण अपघात घडला असून आपघात एवढा भयावह होता की ट्रेलरच्या मध्येच कार घुसल्याने कारचा चक्काचूर झाला असून कारचालकांच्या पत्नीचा शीर धडावेगळा झाला असून चालक जखमी झाला आहे.ह्दयदायी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर आजिवली गावच्या हाद्दीत मुंबईकडे जाणारया दिशेने ट्रेलर आणि ओम्नी कारचा भिषण आपघात घडला असून आपघात सोमवार दि.१२ जुलै रोजी सकाळच्या दरम्यान घडला असून अपघात इतका भयानक होता की ओम्नी कारची चक्काचूर झाला असून कारचालक प्रसन्ना फालक (रा.पुणे) जखमी झाला असून उपचारासाठी एमजीएम रुग्णालय कामोठे येथे हालविण्यात आले असून पत्नी करुणा प्रसन्ना फालक (वय 32,रा-पुणे ) यांचा शीर धडावेगळा होत जागीच मृत्यु झाला आहे. महामार्ग पोलिस, आय.आर.बी.पेट्रोलिंग आणि आपघातग्रस्त टिमने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले असून मयत करुणा प्रसन्ना फालक यांचे शवविच्छेदन पनवेल ग्रामिण रूग्णालयात करण्यात आले आहे.या घटनेची माहिती मिळताच नातेवाईक घटनास्थळी पोहचले आहेत.