मुंबई उपनगर कबड्डी असो. जिल्हा कबड्डी स्पर्धा

Oplus_131072

स्वस्तिक मंडळाचे पूर्व विभागात चौथे जेतेपद

| मुंबई | प्रतिनिधी |

स्वस्तिक मंडळाने मुंबई उपनगर कबड्डी असो.ने आयोजित केलेल्या 43 व्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या पूर्व विभाग प्रथम श्रेणी पुरुषांत सलग चौथ्यांदा जेतेपद पटकवले. याच विभागात द्वितीय श्रेणी पुरुषांत हा मान शूर जवान कबड्डी संघाने मिळविला. पश्चिम विभाग महिलांत संघर्षने विजेतेपद मिळविले. गजानन मंडळ व पार्ले महोत्सव स्पोर्टस्‌‍ अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आ. पराग आळवणी, आयोजक मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार्ले येथील प्ले-ग्राउंडवर हे सामने सुरु होते. पूर्व विभाग प्रथम श्रेणी पुरुषांच्या अंतिम फेरीत कुर्ल्याच्या स्वस्तिक मंडळाने घाटकोपरच्या ओवळी मंडळाला 31-24 असे नमवीत सलग चौथ्यांदा विजेत्यापदाची किमया साधली.

Oplus_131072

संयमी सुरुवात करीत स्वस्तिकने पहिल्या डावात 16-09 अशी आघाडी घेतली. दुसऱ्या डावात आहे ती आघाडी टिकवीत जेतेपदावर शिकामोर्तब केले. अक्षय बर्डे, ऋतिक कांबळे यांच्या चढाई पकडीच्या खेळाला निलेश शिंदे या आंतर राष्ट्रीय खेळाडूच्या कुशल मार्गदर्शनाची साथ लाभल्याने हे शक्य झाले. निलेश प्रत्यक्ष मैदानात उतरला होता. ओवाळीच्या आर्यवर्धन नवाले, अलंकार पाटील यांनी उत्तरार्धात उत्कृष्ट खेळ करीत सामन्यात चुरस आणली. पण पहिल्या डावातील आघाडी त्यांना मोडून काढण्यात ते अपयशी ठरले.

पश्चिम विभाग महिलांच्या अंतिम सामन्यात गोरेगावाच्या संघर्ष मंडळाने बांद्राच्या महात्मा गांधी स्पोर्टस्‌‍ अकादमीचा 34-30 असा चुरशीच्या लढातीत पराभव करीत या गटाचे विजेतेपद आपल्या नावे केले. कोमल देवकर, प्रणाली नागदेवते यांच्या संयमी व धूर्त खेळाला या विजयाचे जाते. स्नेहल चिंदरकर, करीना कामतेकर यांचा खेळ महात्मा गांधी संघाचा पराभव टाळण्यास थोडा कमी पडला. पूर्व विभाग द्वितीय श्रेणी पुरुषांच्या अंतिम सामन्यात मुलुंडच्या शूर जवान कबड्डी
संघाने कुणाल पाटील, निखिल चव्हाण यांच्या झंझावाती खेळाच्या बळावर विक्रोळीच्या टागोर नगर मित्र मंडळावर 45-20 असा लिलाया विजय मिळवीत विजेतेपदाचा चषक उंचावीला. टागोरनगरचा हर्ष शिगवण चमकला.

Exit mobile version