सातारा मॅरेथॉन स्पर्धेत माण तालुक्यासह मुंबईची बाजी

। सातारा । प्रतिनिधी ।
येथे झालेल्या सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये सातार्‍यासह राज्यातील विविध भागांतील एक हजार 228 धावपट्टूंनी सहभाग नोंदवला. या मॅरेथॉनमध्ये सत्तर वर्षांवरील पुरुष गटात छगनलाल भालानी यांनी प्रथम क्रमांक मिळवला, खुल्या गटात पुकळेवाडी (ता. माण) येथील बापू पुकळे यांनी, तर महिला गटात मुंबई येथील मनिषा जोशी यांनी प्रथम क्रमांक मिळवला.
गेली दोन वर्षे न झालेली हिल हाफ मॅरेथॉन यंदा कोरोनाविषयक सर्व नियम पाळत घेण्याचा निर्णय घेत यासाठीची नोंदणी सातारा रनर्स फाउंडेशनच्या वतीने ऑनलाइन करण्यात आली. खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते झेंडा दाखवून स्पर्धा सुरू झाली. विविध वय आणि किलोमीटर गटांत सुमारे एक हजार 228 स्पर्धक सहभागी झाले.
स्पर्धेचा निकाल गटनिहाय पुढीलप्रमाणे (अनुक्रमे पहिले तीन विजेते याप्रमाणे) : महिला : खुला गट- मनीषा जोशी (मुंबई), मधुराणी बनसोडे, वैशाली गर्ग. 30 ते 39 वयोगट- मनीषा जोशी, हिमांगी गोडबोले, स्मिता शिंदे. 40 ते 49 वगोगट- वैशाली गरग, सयुरी दळवी, श्रीविद्या रामनाथ. 50 ते 59 वयोगट- क्रांती साळवी, प्रेयसी चारी, शिल्पी मंडल, 60 ते 69 वयोगट- लता अलीमचंदांनी, आशा शहा, शुभांगी देशपांडे. पुरुष : खुला गट- बापू पुकळे, अनिल कोरवी, धर्मेंद्र कुमार. 30 ते 39 वयोगट- अनिल कोरवी, धर्मेंद्र कुमार, मल्लीकार्जुन पारडे, 40 ते 49 वयोगट- सुनील शिवणे, आर. बी. एस. मोनी, जयंत शिवदे. 50 ते 59 वयोगट- हरीष चंद्रा, पांडुरंग पाटील, विठ्ठल अरगडे. 60 ते 69 वयोगट- पांडुरंग चौगुले, महिपती सपकाळ, अजित कंबोज, 70 वर्षांवरील वयोगट- छगनलाल भालानी, बाळासाहेब भोगम, राजाराम पवार.

Exit mobile version