अश्वनी कुमारची भेदक गोलंदाजी; गुजरातचा विजयी रथ रोखला
| अहमदाबाद | वृत्तसंस्था |
नरेंद्र मोदी स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्समध्ये सामना रंगला. या सामन्याचे नाणेफेक गुजरातने जिंकून प्रथम बॉलिंगचा निर्णय घेतला. यानंतर मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 199 धावा केल्या आणि मुंबईला 200 धावांचे लक्ष्य दिले. याउलट गुजरातची कामगिरी विशेष राहिली नाही. गुजरातला फक्त 100 धावा करता आल्या आणि सामना मुंबईने 99 धावांनी जिंकला.
सलग चार सामने गमावल्यानंतर, पाच वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सने अखेर विजयाचा सूर गवसला आहे. आयपीएल 2026 चा पहिला सामना जिंकल्यानंतर, सलग दोन पराभवांचा सामना करणाऱ्या मुंबईने एकतर्फी सामन्यात गुजरात टायटन्सला 99 धावांनी पराभूत केले. तिलक वर्माच्या पहिल्या आयपीएल शतकाने मुंबईला 199 धावांपर्यंत पोहोचवले, तर सलग सहा सामन्यांपासून विकेट न घेतलेल्या जसप्रीत बुमराहनेही गोलंदाजीत पहिली विकेट घेऊन संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर, या हंगामातील आपला पहिला सामना खेळणाऱ्या वेगवान गोलंदाज अश्वनी कुमारने चार विकेट्स घेऊन मुंबईचा विजय निश्चित केला.
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएल 2026 च्या 30व्या सामन्यात, गुजरात टायटन्सला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. जेव्हा सामना सुरू झाला, तेव्हा याची कोणीही अपेक्षा केली नसेल. विशेषतः कागिसो रबाडाने आपल्या वेगवान गोलंदाजीने पॉवरप्लेमध्ये मुंबईसाठी केवळ 44 धावांत तीन विकेट्स घेतल्या. पण मग नमन धीरने एक शानदार खेळी करून संघाला नियंत्रणात आणले आणि धावसंख्या शंभर धावांच्या जवळ नेली. यानंतर संपूर्ण डाव तिलक वर्माच्या नावावर राहिला. मागील 5 सामन्यांमध्ये केवळ 43 धावा करणाऱ्या तिलकने या सामन्यात अवघ्या 45 चेंडूंमध्ये शानदार शतक झळकावले. एके वेळी तिलक 22 चेंडूंमध्ये केवळ 19 धावांवर खेळत होता, पण येथून पुढे तो अचानक स्फोटक बनला आणि अचूक गोलंदाजी करणाऱ्या जीटीच्या गोलंदाजांना झोडपून काढले. डावाच्या शेवटच्या चेंडूवर चौकार मारून तिलकने आयपीएलमधील आपले पहिले शतक पूर्ण केले. या सामन्यात गुजरात टायटन्सकडून वॉशिंग्टन सुंदरने 26 सर्वाधिक धावा केल्या. शुभमन गिलने 14, शाहरुख खानने 17 आणि कागिसो रबाडाने 12 धावा केल्या. कर्णधार हार्दिक पांड्या नाणेफेक हरला आणि त्याला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले. मुंबईची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली, त्यांनी 50 धावांतच तीन गडी गमावले. फलंदाजीचा वेगही लक्षणीयरीत्या मंदावला होता. डावाच्या 17 व्या षटकापर्यंत मुंबईची धावसंख्या केवळ 141 होती. गुजरातच्या भेदक गोलंदाजीसमोर मुंबई केवळ 160 किंवा 170 धावाच करू शकेल असे वाटत होते, पण शेवटच्या तीन षटकांत जे घडले त्याने बाजी पलटवली.
असा पलटला सामना
मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनाही या गोष्टीचा फायदा झाला. विशेषतः अश्वनी कुमारने कहर केला. अश्विनीने मुंबईसाठी 4 षटकांत 24 धावा देऊन 4 बळी टिपले. मिचेल सँटनर आणि अल्लाह गझनफर यांनीही प्रत्येकी 2 बळी घेतले, तर जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या यांनी नव्या चेंडूने प्रत्येकी 1 बळी घेत गुजरातला गारद केलं. अशाप्रकारे, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरताचा संघ 15.5 षटकांत अवघ्या 100 धावांवर ऑलआऊट झाला आणि मुंबईलने 99 धावांनी दणदणीत विजय मिळवला.
18 चेंडूंत 58 धावा
गुजरातविरुद्ध मुंबईच्या संघाची संथ फलंदाजी पाहिल्यावर, ते 199 धावांपर्यंत पोहोचतील अशी कोणालाच अपेक्षा नव्हती. मात्र, शेवटच्या 18 चेंडूंमध्ये तिलक वर्माने (45 चेंडूंत 101 धावा) 58 धावा जोडून आपल्या संघाची पडती बाजू सावरलली. आणि हाच क्षण मुंबईसाठी सामन्यातील निर्णायक क्षण, अगदी टर्निंग पॉईंट ठरला म्हणा ना.. कारण 200 धावा करण्याचा मानसिक दबाव गुजरातच्या फलंदाजांवर वाढत गेला. त्यानुळे, पटापट, वेगाने धावा करण्याच्या प्रयत्नात गुजरातची आघाडीची फलंदाजी पूर्णपणे कोसळली.
