अनधिकृत टपऱ्यांवर पालिकेची कारवाई

| पनवेल | वार्ताहर |

पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने बुधवारी (दि.27) पालिका हद्दीतील अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली. प्रभाग क्रमांक ‘अ’ मधील टपऱ्यांवर करण्यात आलेल्या या कारवाई प्रसंगी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्याचप्रमाणे पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे कर्मचारी अधिकाऱ्यांसोबत जेसीबी आणि डम्परचा कारवाईत समावेश होता. आयुक्त गणेश देशमुख यांच्या निर्देशाने सुरु असलेल्या या कारवाईत पालिका हद्दीतील शाळा, कॉलेज परिसरातील तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्या टपऱ्या अतिक्रमण विभागाच्या रडारवर आहेत.

Exit mobile version