• Login
Sunday, February 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

मालमत्ता करावर पालिकेची भिस्त

Krushival by Krushival
February 23, 2024
in sliderhome, पनवेल
0 0
0
मालमत्ता करावर पालिकेची भिस्त
0
SHARES
70
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अर्थसंकल्पात मालमत्ता कराच्या थकबाकीचा ‌‘फुगा’

| पनवेल | प्रतिनिधी |

मालमत्ता करापोटी पालिकेच्या तिजोरीत 1 हजार 163 कोटी रुपये जमा होतील, अशी अपेक्षा ठेवून पनवेल पालिकेकडून 2024-25 चे अर्थसंकल्प शुक्रवारी (दि.23) सादर करण्यात आले. मालमत्ता कराच्या थकबाकीपोटी 1163 कोटी रुपये मनपाला मिळतील, असा अंदाज देशमुख यांनी लावला आहे. यामुळे या अर्थसंकल्पामध्ये थकबाकीचा फुगा दिसून येत आहे. एकूण 32 कोटी रुपयांचे शिल्लकीचा अर्थसकंल्प मांडण्यात आला आहे.

पनवेल महानगरपालिकेची स्थापना होऊन सात वर्षे पूर्ण झाली. दरम्यान, गेल्या वर्षी सिडकोने सेवा हस्तांतरित केल्या आहेत. त्या अगोदर प्राधिकरणाकडून सोयी-सुविधा दिल्या जात होत्या. सिडकोलासुद्धा रहिवाशांनी सेवाशुल्क अदा केले. तर, पनवेल महानगरपालिकेने तब्बल पाच वर्षांचा मालमत्ता कर पनवेलकरांवर लादला. त्याला सामाजिक संस्था आणि सिडको वसाहतीतील रहिवाशांनी विरोध केला आहे. याविरोधात परिवर्तन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महादेव वाघमारे यांचा न्यायालयीन लढा सुरू आहे. सिडकोने सेवा पुरवलेल्या असताना वेगवेगळ्या सेवाविषयक कर मनपाला का भरायचा, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. दुहेरी मालमत्ता कराबाबत सिडको वसाहतींमध्ये तीव्र असंतोष आहे. पूर्वलक्षी कर वसूल करण्याचा तगादा पनवेल मनपाने लावला आहे. इतकेच नाही तर, जप्तीच्या धमक्या दिल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासक तथा महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी शुक्रवारी पनवेल महानगरपालिकेचा 3991 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. गेल्या वर्षी हाच अर्थसंकल्प 2291 कोटी रुपयांचा होता. त्यामध्ये यंदा जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. याचे कारण म्हणजे, मालमत्ता करापोटी असलेली थकबाकी 1163 कोटी रुपये वसूल होईल, असे प्रशासक तथा आयुक्त गणेश देशमुख यांनी गृहीत धरले आहे. त्यामुळेच त्यांनी इतक्या मोठ्या किमतीचे अंदाजपत्रक पनवेलकरांसाठी सादर केले. आरंभीची शिल्लक 1258 कोटी रुपये दाखवण्यात आली आहे. त्याचबरोबर महानगरपालिकेला एकूण करातून 1411 कोटी रुपये येणे अपेक्षित आहे. त्यामध्ये 1163 कोटी रुपयांची थकबाकी शिल्लक असल्याचे आयुक्त गणेश देशमुख यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये दिसून आले आहे. यावरून पनवेल महानगरपालिका पूर्वलक्षी आणि दुहेरी मालमत्ता कर वसूल करण्यासाठी आग्रही असल्याचे दिसून आले आहे.

महिलांविषयक धोरण अधोरेखित
यंदा आयुक्त गणेश देशमुख यांनी महिलांविषय धोरण आपल्या अर्थसंकल्पामध्ये हायलाईट केले आहे. यामध्ये महिलांना रोजगार देण्याच्या अनुषंगाने प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. ज्या कंपन्या स्त्रियांना रोजगार देतील, त्यांना करात सवलत देण्यात येणार आहे. पिंक टॉयलेट उभारण्यात येणार आहेत. शिक्षणासाठी बाहेर जाणाऱ्या विद्यार्थिनींसाठी पन्नास हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. आदिवासी महिला भगिनींसाठी 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महिला सक्षमीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे. स्त्रियांसाठी खास व्यायामशाळा साकारण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, जिम ट्रेनरसुद्धा पालिका पुरवणार आहे. महिला सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून दीड हजार सीसीटीव्ही सर्किट कॅमेरे लावण्यात येणार आहेत. अबोली रिक्षासुद्धा महिलांना स्वयंरोजगारासाठी दिल्या जाणार आहेत. पनवेल महिला सुकन्या योजना या अर्थसंकल्पामध्ये सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जन्माला आलेला प्रत्येक मुलीच्या नावावर राष्ट्रीयीकृत बँकेमध्ये 30 हजार रुपये ठेवण्यात येणार आहे. महिलांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. महापालिका तेथे कोचिंग क्लासेस सुरू करणार आहे. या व इतर योगदानासाठी नवीन आर्थिक वर्षात सव्वा दोनेशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

1 डिसेंबर 2022 पर्यंत वसाहतींमध्ये सिडको पायाभूत सुविधा पुरवत होती. या बदल्यामध्ये रहिवाशांनी सेवाशुल्क अदा केले आहे. त्यानंतर पनवेल महानगरपालिकेने या सेवांचा ताबा घेतला. त्यामुळे 2022 पर्यंत दुहेरी कर वसूल करण्याचा मनपाला अधिकार नाही. असे असतानाही त्या कालावधीमधील कर उत्पन्न म्हणून महापालिका गृहीत धरत असेल, तर ती चुकीची गोष्ट आहे. त्यामुळे अर्थसंकल्पाला फुगवटा आल्याचे दिसून येत आहे.

महादेव वाघमारे, संस्थापक, परिवर्तन सामाजिक संस्था

पनवेल महानगरपालिकेचा जो अर्थसंकल्प आहे. त्या आकडेवारी मध्ये आम्हाला जायचे नाही. मात्र, मनपा आयुक्त गणेश देशमुख यांनी महिलांविषय धोरणासाठी विशेष तरतूद केल्याचे समजते. मनपा क्षेत्रातील स्त्रियांसाठी वेगवेगळ्या योजना, सक्षमीकरण व सबलीकरण, सुरक्षितता आणि सुविधा देण्यासंदर्भात अर्थसंकल्पामध्ये सकारात्मक भूमिका प्रशासनाने घेतली आहे. त्यामुळे आयुक्त आणि महापालिकेने घेतलेल्या निर्णयाचे समस्त महिलावर्गाकडून स्वागत करण्यात येत आहे. त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात यावी, हीच माफक अपेक्षा.

नीलम आंधळे, संस्थापिका, दिशा व्यासपीठ

Related

Tags: Bhista of the municipalitybudgetindiakrushival mobile appmahanagar palikamaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel munciple corporationpanvel newsproperty taxraigadsocial media newssocial news
Previous Post

पुरवठा अधिकारी कार्यालयाचा अजब कारभार

Next Post

मनोज जरांगेचा आंदोलनाचा इशारा

Krushival

Krushival

Related Posts

पोलादपूरमध्ये गुरांच्या गोठ्याला आग; दोन गाई जखमी
sliderhome

डोंबिवलीत भीषण आग; 29 दुचाक्या खाक

February 15, 2026
नार्वेकरांना पळवलं?
sliderhome

नार्वेकरांना पळवलं?

February 14, 2026
हातरिक्षाचालकांचे पुनर्वसन रखडले
sliderhome

हातरिक्षाचालकांचे पुनर्वसन रखडले

February 14, 2026
रस्त्याच्या कामातून धुळीचे साम्राज्य
sliderhome

रस्त्याच्या कामातून धुळीचे साम्राज्य

February 14, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

मंत्री झिरवाळ ‌‘नॉट रिचेबल‌’

February 14, 2026
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: सहा जणांवर आरोप निश्चित
sliderhome

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: सहा जणांवर आरोप निश्चित

February 14, 2026
Next Post
मनोज जरांगेचा आंदोलनाचा इशारा

मनोज जरांगेचा आंदोलनाचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?