। पनेवल । वार्ताहर ।
पनवेल महापालिका क्षेत्रात कोव्हिडमुळे पालक गमावलेल्या बालकांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय महापालिकेच्या महिला बालकल्याण समितीतर्फे घेण्यात आला आहे.तसेच कोरोना संसर्गामुळे ज्या महिलांच्या पतीचे निधन झाले आहेत अशा एकल महिलांनाही अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.
याचबरोबर पती निधनानंतर एकल महिलांना विधवा म्हणून संबोधले जाते. अशा शब्दातून त्यांचा अवमान व उपेक्षा केली जाते. म्हणून यापुढे विधवा असा शब्दप्रयोग न करता विवाहित एकल महिलाफ असे संबोधण्यात यावे, असा ठराव यावेळी करण्यात आला.पनेवल महानगरपालिकेच्या पाचव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून महिला बालकल्याण विभागाने दोन महत्त्वाच्या विषयास मान्यता दिली. घेतले. पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात कोविडमुळे एक किंवा दोन पालक गमावलेल्या बालकांना आर्थिक मदत मिळणार आहे. दिनांक 12 मार्च 2020 नंतर कोविड 19 या संसर्गामुळे ज्या बालकांचे एक पालक मृत्यू पावले आहेत अशा बालकांना 25 हजार रुपये तर दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना 50 हजार रूपयाचे अर्थसहाय्य मिळणार आहे.तसेच करोना संसर्गामुळे ज्या महिलांचे पती निधन पावले आहेत अशा मएकलफ महिलांना 50 हजार रुपयांचे अर्थसाह्य मिळणार आहे.
महिला बालकल्याण समितीच्या झालेल्या ऑनलाईन बैठकीत यालास मान्यता देण्यात आली. महिला बालकल्याण समिती सभापती मोनिका महानवर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस महिला बालकल्याण समितीच्या सदस्या नगरसेविका तसेच अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, सहाय्यक आयुक्त वंदना गुळवे, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यासाठी काही नियम व अटी लागू असणार आहेत.