आपत्ती नियंत्रणासाठी महापालिका सज्ज

। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात पावसाळ्यात आपत्ती आल्यास लागणार्‍या अत्यावश्यक विविध वस्तू, आपत्ती व्यवस्थापन कक्ष,आपत्ती काळात लागणारे अत्यावश्यक फोन नंबर अशा विविध विषयांचा आढावा आपत्ती व्यवस्थापनाच्या मंगळवारी 21 जून रोजी मुख्यालयात बैठक घेण्यात आला. पनवेल महानगरपालिकेमार्फत महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांसाठी पावसाळ्यादरम्यान येणार्‍या आपत्ती नियंत्रणासाठी 24 तास सुरू असलेले नियंत्रण कक्ष मुख्यालय येथील अग्निशामन विभाग येथे तळमजल्यावर सुसज्ज करण्यात आले आहे. 1 जून ते 30 सप्टेंबर या काळात कोणतीही आपत्ती उद्भवल्यास नागरिकांनी आपत्कालीन नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे.
यावेळी उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त गणेश शेटे, उपायुक्त कैलास गावडे, सहाय्यकआयुक्त डॉ.वैभव विधाते, प्रभाग अधिकारी, मुख्यालयातील अधिकारी उपस्थित होते. प्रभाग समित्यांमध्ये देखील आपत्ती व्यवस्थापनासाठी विशेष तयारी करून ठेवण्यात यावी,तसेच आपत्ती काळात मुख्यालय आणि प्रभाग समितीच्या कर्मचार्‍यांनी एकमेकांमध्ये संवाद साधून काम करावे अशा सूचना यावेळी प्रभाग अधिकार्‍यांना देण्यात आल्या.

आपत्ती काळात प्रभाग समिती ‘अ’ खारघर प्रभाग, अधिकारी जितेंद्र मढवी मो.नं 9819998788, प्रभाग ‘ब’ कळंबोली, प्रभाग अधिकारी सदाशिव कवठे मो. नं 9819633174 , प्रभाग ‘क’,प्रभाग अरविंद पाटील मो.नं 9322351897, स्वच्छता निरीक्षक ऋषीकेश गायकवाड, प्रभाग क्र. 11, 12 मो नं 9619314475, स्वच्छता निरीक्षक अतुल वास्कर प्रभाग 12 मोनं 8452961094, स्वच्छता निरीक्षक जयेश कांबळे प्रभाग क्र 14 मोनं 8169254174, प्रभाग ‘ड’ प्रभाग अधिकारी अमर पाटील मोनं8369673169 तसेच मुख्यालयातील अग्निशमन विभागास 022-27458040/41/42, दुरध्वनी 022-27469500 ,टोल फ्री :- 1800227701 । व्हाट्स अ‍ॅप 9769012012 या क्रमांकावरती यांच्याशी नागरिकांनी संपर्क साधावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे .

Exit mobile version