Rain Updates: उरणमध्ये मुसळधार पाऊस; पूरपरिस्थितीत नगराध्यक्षांकडून मदतकार्य

स्वतः पाण्यात उतरून परिस्थितीची पाहणी

। उरण । प्रतिनिधी ।

उरण तालुक्यात, शहरात सतत जोरदार पाऊस सुरु असून उरण शहरात शनिवारी (दि.4) झालेल्या प्रचंड मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचून पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा कठीण प्रसंगी उरण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी स्वतःच्या सुरक्षिततेची पर्वा न करता थेट मैदानात उतरून मदतकार्य सुरू केले आहे.

सत्र न्यायालय (सेशन कोर्ट) परिसर आणि उरणमधील इतर गंभीर पूरग्रस्त भागांमध्ये भावना घाणेकर यांनी स्वतः पाण्यात उतरून परिस्थितीची पाहणी केली. अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवणे आणि पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला गती देणे, यासाठी त्या स्वतः जागोजागी धावपळ करताना दिसत आहेत.

नगराध्यक्षांच्या या धाडसी भूमिकेमुळे ‘प्रशासकीय यंत्रणा संपूर्ण ताकदीने नागरिकांच्या पाठीशी उभी असून, कोणीही घाबरून जाऊ नये,’ असे आवाहन यावेळी नगराध्यक्षांनी केले आहे.

Exit mobile version