नगरपरिषदेचा कोट्यवधीचा महसूल बुडविला

। खोपोली । प्रतिनिधी ।

नगरपरिषदेकडून बांधकाम परवानगी घेण्यासाठी शासकीय निर्देशानुसार पूर्ण विकास शुल्क जमा केल्याशिवाय बांधकाम परवानगी देता येत नसतानाही तात्कालिन मुख्याधिकारी, सहाय्यक नगररचनाकार यांनी विकासाकडून 17 कोटी ऐवजी फक्त 5 कोटी आँफलाईन पध्दतीने जमा करून घेत परवानगी दिली आहे. या परवानगीवर स्वाक्षरी आहेत. बांधकाम परवानगीच्या पत्राचे आणि एका मृत्यु दाखल्याचा जावक क्रंमाक एकच असून संबंधीत कागदपत्रे गायब असल्याची खळबळजनक माहिती माहितीच्या अधिकाराखाली उघड झाल्याचे खोपोली नगरपरिषदेचे माजी नगरसेवक किशोर पानसरे यांनी सांगत तात्कालिन मुख्याधिकारी अनुप दुरे, सहाय्यक नगररचनाकार भाग्यश्री भांडाळकर आणि विकासक चंद्रकांत मोहनलाल भन्साळी यांच्या कारवाई करण्याची मागणी माजी नगरसेवक पानसरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली आहे.

पुणे-मुंबई रस्त्याच्या बाजूलाच लागून असलेल्या जागेची बांधकाम परवानगी देण्यासाठी भ्रष्टाचार झाल्याचे निदर्शनास आणून देण्यासाठी माजी नगरसेवक किशोर पानसरे यांनी पत्रव्यवहार करीत माहितीच्या अधिकाराखाली मिळाल्या माहितीत मोठा भ्रष्टाचार उघड झाल्याची माहिती पत्रकार परिषद देताना सांगितले की विकासक चंद्रकांत मोहनलाल भन्साळी यांनी यांच्या मिळकत संदर्भात नगरपरिषदेकडून दिनांक 17 मे 2023 रोजी बांधकाम परवानगी दिली आहे. परवानगी देताना आँनलाइन पध्दतीने 17 कोटी दरम्यान विकास शुल्क जमा करण्याचे असताना जवळपास 5 कोटी 19 लाख 62 हजार 749 एवढा विकास शुल्क जमा करीत आँफलाईन पध्दतीचे परवानगी दिली असून त्यावर मुख्याधिकारी अनुप दुरे, सहाय्यक नगररचनाकार भाग्यश्री भांडाळकर यांची स्वाक्षरी असल्याचे इमेलवर निदर्शनास आले आहे. जावक क्रमांक 617 आहे. परंतु खोपोली नगर परिषद नागरी सेवा केंद्र विभागात जावक क्र.617 हा श्री. रमेश सत्यजित देशमुख यांच्या मृत्यू दाखल्याचा असल्याचे निदर्शनास आले आहे.

Exit mobile version