नगरपालिकांच्या सप्टेंबरमध्ये निवडणुका?

। आगरदांडा । वार्ताहर ।
राज्यातील लवकरच मुदत संपणार असलेल्या 208 नगरपालिकांमध्ये निवडणुका घेण्याच्या दृष्टीने हालचालींना आता वेग आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेवर हरकती व सूचना मागविण्याचा जो कार्यक्रम जाहीर केला तो लक्षात घेता जुलैच्या दुसर्‍या वा तिसर्‍या आठवड्यात निवडणुकीची तारीख जाहीर होईल व निवडणूक सप्टेंबरमध्ये होईल, अशी शक्यता आहे.

नागरिकांनी दिलेल्या हरकती व सूचनांवर संबंधित जिल्हाधिकारी सुनावणी घेतील आणि त्याचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे देतील व त्या आधारे आयोग प्रभाग रचनेला अंतिम स्वरूप देईल. प्रभाग रचनेचे प्रारूप प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यावेळी प्राप्त झालेल्या व आता नव्याने प्राप्त होणार्‍या हरकती व सूचनांवर एकत्रित ही सुनावणी देण्यात येईल.त्यानंतर अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करून प्रभाग रचनेला मान्यता देईल. त्याच सुमारास अनुसूचित जाती, जमाती आणि महिला आरक्षण जाहीर केले जाईल. या वर्षी निवडणूका ओबीसी आरक्षणाविना होणार आहेत.

Exit mobile version