नगरपरिषद निवडणुका लांबणीवर

। आगरदांडा । प्रतिनिधी ।
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाचा निकाल 21 एप्रिलला न दिल्याने राज्यातील नगरपरिषदेच्या निवडणुका आणखी लांबणीवर जाणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांचा पुन्हा हिरमोड झाला आहे. नगरपरिषदे मार्फत प्रभाग रचना आराखडा मागविण्यात आल्या. परंतु या दरम्यान ओबीसी आरक्षण मुद्दा पुढे आला जो पर्यंत ओबीसी समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका घेतल्या जाऊ नयेत अशीच मागणी पुढे आली. त्याबरोबर प्रभाग रचना करण्याचा अधिकार ही राज्य शासनाने आपल्या कडे घेतल्याने.या निर्णयाबाबत सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल झाली आहे.त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने 21 एप्रिल ला सुनावणी घेणार होते.परंतु या याचिकेवरील सुनावणी आता 4 मे पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.हा विषय आता सर्वोच्च न्यायालयात गेल्याने या निवडणुका कीती महिने पुढे जाणार हे आता स्पष्ट होताना दिसत नसला तरीही या निवडणुका साधारण आजुन सहा महिने लांबणीवर जाऊ शकतात असे येथील राज्यकीय विशेलेषण मत आहे.

Exit mobile version