मुनवली चषक क्रिकेट स्पर्धा

बापदेव मांडवखार संघ अंतिम विजेता

| सोगांव | वार्ताहर |

मुनवली येथील घाडी बंधु पुरस्कृत मुनवली चषक 2024 च्या मूनवली येथे क्रिकेट स्पर्धांचे आयोजन दि.27 व 28 जानेवरी रोजी करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण 16 नामवंत संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत अंतिम सामना बापदेव मांडवखार व जय हनुमान संघ मूनवली या संघात झाला. अटीतटीच्या लढतीत बापदेव मांडवखार संघाने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक 30, 000 व चषक पटकावला तर द्वितीय क्रमांक 15,000 व चषक जय हनुमान मूनवली संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज म्हणून कल्पेश पाटील बापदेव मांडवखार संघ याने पटकावले तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून गांधार पाटील बापदेव मांडवखार संघ याने पटकावले, तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून समीर ठकरूळ जय हनुमान मूनवली संघ याला गौरविण्यात आले. सामनावीर म्हणून जय हनुमान संघाचा प्रतीक अनमाने याला मान देण्यात आला, यावेळी सर्व खेळाडूंना व संघांना धर्मा अनमाने व सुनीता अनमाने यांच्या स्मरणार्थ प्रतीक प्रमोद अनमाने यांजकडून ट्रॉफी देण्यात आली. तसेच सामन्यादरम्यान उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रत्येक खेळाडूंना अल्पेश मल्हार आणी अतिष मल्हार यांजकडून टी शर्ट चे वाटप करण्यात आले. या सर्वांना मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

बक्षीस समारंभास रायगड जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष सुनिल थळे व उमेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सानिका घाडी, समद कुर, संजय शिंदे, विवेक जोशी, लाईक कप्तान, अनिल जाधव, चंद्रकांत खोत, संजय शिंदे, विवेक जोशी, संजय अनमाने, मधुकर सूद, सूचित थळे, सचिन घाडी, तसलीम कप्तान, तौसिफ कप्तान, साहिल कुर, अरविंद मसुरकर, संतोष सकरे, मुनवली महिला मंडळ तसेच मुनवली ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील नागरिक व क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version