| भाकरवड | वार्ताहर |
मॅजिक बस इंडिया फौंडेशन व जेएसडब्ल्यू फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पेण, अलिबाग व मुरुड तालुक्यातील 21 शाळामध्ये जेएसडब्लू अस्पायर प्रकल्प राबविला जातो. प्रकल्प अंतर्गत 3000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना जीवनकौशल्य तथा भाषाज्ञान, अंकज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाते तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते.
यावेळी प्रकल्पाकडून दहावी नंतर विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी याविषयी मार्गदर्शन तसेच भित्तीचित्र काढण्यात आले. या काढलेल्या करियर वॉल पेंटिंगचे उद्घाटन (दि.13) सार्वजनिक वाचनालय आणि ग्रंथालय, शहाबाजचे अध्यक्ष नितिन रामचंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी शहाबाज ग्रामपंचायतीच्या सदस्या अश्विनी पाटील, मंगेश भगत, सचिता पाटील, मनेश पाटील, रूपाली पाटील, नितीन पाटील, राजेंद्र टेमकर, प्रकाश पाटील, जगन्नाथ पाटील, संगीता टेमकर, डॉ. प्रगती पाटील, दर्शना पाटील, मिनल धुमाल उपस्थित होते.