आरोपीस पोलिसांनी केले गजाआड
। पनवेल । वार्ताहर ।
अतिप्रसंग करण्यास विरोध करणार्या एका महिलेचा खून करून पसार झालेल्या आरोपीस मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
दावडीगांव, डोंबवली पूर्व येथील ओम रेसिडेन्सी, फ्लॅट नं. बी/003 या रुममधील सोफासेटमध्ये एका महिलेचे शव मिळून आल्याची घटना मंगळवारी (दि.15) मानपाडा पोलीस ठाणेचे हद्दीत घडली होती. सदर घटनेची माहिती मिळताच वपोनिरी शेखर बागडे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ पोलीस पथकासह घटनास्थळी गेले. किशोर शिंदे यांच्या घरातील सोफासेटमध्ये त्यांची पत्नी सुप्रिया हिचे शव कोणीतरी अज्ञात इसमाने लपवून ठेवले होते. सदर महिलेचे व तिचे पतीचे कोणाशी कोणतेही वाद नव्हते. सदर महिलेस कोणी व कोणत्या कारणास्त्व मारले याबाबत निश्चित कारण नव्हते. या घटनेबाबत महिलेचे पती किशोर अनंत शिंदे याच्या तक्रारीवरुन मानपाडा पो.स्टे . गुरनं 108/2022 भादविक 302,201 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येवुन गुन्ह्याचा तपास चालू केला. तपासातील माहितीवरून संशयीत विशाल भाऊ घावट यास ताब्यात घेवून त्याच्याकडे सखोल चौकशी करता, विशाल हा सुप्रियाला नेहमी पुस्तके वाचायला देत असे. मंगळवारी विशाल याने दुपारी पुन्हा सुप्रिया हिच्या घरी जावुन पुस्तके दिली. त्यावेळी ती घरात एकटीच असल्याचा गैरफायदा घेवून विशाल याने सुप्रियावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. परंतु तिने त्यास प्रतिकार करुन दरवाजाकडे जावमन आरडाओरड करण्यास सुरूवात करताच विशाल याने सुप्रियाचे डोके पकडून फरशीवर आपटण्यास सुरवात केली. तसेच त्याचे खिशात असलेल्या नायलॉन केबल टायने सुप्रियाचा गळा आवळून तिला जीवे ठार मारले. त्यानंतर तिचे शव त्याने घरातील सोफासेटचे आतमध्ये लपवून ठेवून तेथून पळुन गेल्याचे तपासात निष्पन्न झाले.