धक्कादायक! अवघ्या ५ हजारांसाठी डोक्यात लाटणे घालून केला महिलेचा खून

। मुंबई । वृत्तसंस्था ।
मुंबईतील घाटकोपरमधील रमाबाई नगर येथे अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेने अवघ्या ५ हजार रुपयांसाठी एका महिलेची डोक्यात लाटणे घालून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रेखा धोबी ( वय २५ ) मृत महिलेची हत्या ५१ वर्षीय ममता उके हिने केली असल्याचे समोर आले आहे. रेखाचे पती आशिष यांनी २० टक्के व्याजाने ममताकडून ५ हजार रुपये घेतले होते. त्याचे व्याज त्याने दिले होते. मात्र ममताला त्याच्याकडून व्याजाने दिलेले पाच हजार रुपयेही हवे होते. यासाठी ममता वारंवार रेखा आणि आशिषकडे पैशाची मागणी करत होती. ममता ही रेखा हिच्या घरी गेली. तिने पुन्हा पैशांची मागणी केली. त्यांच्यात यावरून बाचाबाची झाली. ममताने रागाच्या भरात घरातील लाटणे घेऊन रेखाच्या डोक्यात प्रहार केले. यात रेखा जखमी झाली. त्यामुळे तिला रुग्णालयात नेल्यानंतर तिचा मृत्यू झाला, असे प्रत्यक्षदर्शी आणि रेखाची नातेवाइक अश्विनी गमरे हिने सांगितले.रेखाचा यात मृत्यू झाला. पंतनगर पोलिसांनी या प्रकरणी आरोपी महिलेविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती परिमंडळ सातचे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Exit mobile version