। ठाणे । प्रतिनिधी ।
धक्का लागल्याच्या कारणावरून धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. या घटनेतील फरार असलेल्या सहा आरोपींना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. अमर महाजन, अक्षयकुमार वागळे, अतुल कांबळे, नीलेश ठोसर, प्रतीकसिंग चौहान आणि लोकेश चौधरी अशी अटक केलेल्या हल्लेखोरांची नावे आहेत. मानपाडा पोलिसांनी शिताफीने तपास करत 48 तासांत नाशिक, मालेगाव आणि चाळीसगाव येथून त्यांना ताब्यात घेतले.
आकाश सिंग हा तरुण डोंबिवली पूर्वेतील मालवण किनारा हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेला होता. जेवण करून बाहेर निघताना त्याचा तरुणाला धक्का लागला होता. या किरकोळ कारणाचा राग मनात धरून हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केली. या घटनेनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले होते. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक यंत्रणा व गुप्त बातमीदारांच्या मदतीने तपास करत फरार असलेल्या सहा आरोपींना अटक केली.







