अज्ञात महिलेचा खालापुरात खून; नवर्‍यावर संशय व्यक्त

। खोपोली । वार्ताहर ।
खालापूर तालुक्यातील हाळ फाट्यापासून कर्जतला जाणार्‍या रस्त्यावर अंजरुण गावाजवळ हॉलिडे इन या रिसॉर्ट समोर एका महिलेचा खून झाल्याची घटना घडली आहे. सदर महिलेचा पती गायब असल्याने तिचा खून त्यानेच केला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

ही महिलाही त्याच परिसरात आपल्या नवर्‍यासह राहात होती.त्या महिलेची व्यवस्थित तपासणी केली असता तिचा मृत्यू हा नैसर्गिक नसून तिचा नक्की खून झाला असल्याची खात्री पोलिसांना झाली तेव्हा त्यांनी कसून शोध सुरू केला.

सदर महिले बाबत आजूबाजूस चौकशी केली असता ती व तिचा पती प्लास्टिक बाटल्या, भंगार गोळा करण्याचे काम करीत होते. व त्याच ठिकाणी एका पडीक जागेत व एका दुकानाच्या व्हरांड्यात ते राहात असत. आणि रोज त्यांची दोघांची भांडणे होत असत. त्यांचा तसा कोणाशी ही संपर्क नसल्याने त्यांचे नाव गाव कोणासही माहीत नव्हते.त्यातच तिचा नवरा ही गायब असल्याने त्यानेच तिचा खून केला असावा व तो गायब झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. खालापूर पोलीस ठाण्यात याबाबत खुनाचा गुन्हा नोंदवून पुढील अधिक तपास पोलीस करीत आहेत असे पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी सांगितले.

Exit mobile version