| पुणे | प्रतिनिधी |
पुण्यातील रामटेकडी परिसरात असलेल्या वंदे मातरम चौकात मध्यरात्री टोळक्यांकडून राजू शिवशरण याचा पाठलाग करत दगडाने ठेचून खून करण्यात आला. राजू शिवशरण हा रामटेकडी परिसरातील कुख्यात गुंड होता. राजू शिवशरण खून प्रकरणात वानवडी पोलिसांनी पाच संशयिताना ताब्यात घेतले आहे.