भारतीय विद्यार्थ्याची कॅनडात हत्या

| टोरोंटो | वृत्तसंस्था |
कॅनडात टोरोंटो येथे एका 21 वर्षीय भारतीय विद्यार्थ्यांची एका अज्ञात हल्लेखोराने गोळ्या घालून हत्या केली. येथील भुयारी रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारापाशी ही घटना घडली. कार्तिक वासुदेव असे या मृत विद्यार्थ्यांचे नाव असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, गंभीर जखमांमुळे त्याचा मृत्यू झाला. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी या हत्येविषयी शोक प्रकट केला.

Exit mobile version