मुरुड किनारा झाला चकाचक

समुद्रकिनार्‍याचे सुशोभिकरण अंतिम टप्प्यात

| मुरुड जंजिरा | वार्ताहर |

मुरुड जंजिरा समुद्रकिनार्‍यावर एकदरा खाडीतील काढलेला वाळू व गाळ टाकल्याने किनार्‍यावर 60 ते 1000 फुटांचा भराव तयार झाला. त्याच भरावावर मुरुड किनारा सुशोभिकरणाचा आराखडा बनवण्यात आला. आज हे काम अंतिम टप्प्यात असल्याने मुरुडकर खुश आहेत. आज येणारे पर्यटक भली मोठी पार्किंगची जागा पाहून आनंदित होत आहेत. त्यामुळे पुढील काळात मुरुडला येणार्‍या पर्यटकांची संख्या वाढणार यात दुमत नाही.

कोकणातील समुद्रकिनारे पर्यटन विकासांतर्गत विकसित करण्यासाठी राज्य सरकारने विशेष निधी दिला. मुरुड शहराचा विकास हा समुद्रकिनारा सुशोभिकरण केल्यावर अतिशय वेगाने होणार आहे. मुरूड किनारीवरील चेंजिंग रूम ते वॉच टॉवर असा किनारा विकसित होणार आहे. समुद्रकिनारी 40 फूट/1000 फूट बंधारा असणार आहे. याठिकाणी आकर्षक फूड स्टॉल, पर्यटकांना बसण्यासाठी विदेशी धर्तीवर आसन क्षमता असणार आहे. गाडी पार्किंग समुद्रापासून 10 फुटावर असल्याने पर्यटकांना पोहताना आपली गाडी पाहता येईल.हजारो पर्यटक आले तरी मुख्य रस्त्याला गर्दी होणार नाही. कारण कोणतीही गाडी मुख्य रस्त्यावर पार्किंग होणार नाही.

मुरुड बाजारात अधिकृत पार्किंग असायला पाहिजे. बाजारातील रस्त्यानं एकेरी मार्ग करून वाहतूक नियोजन पोलिसांनी व पालिकेने करण्याची गरज आहे. मुख्य बाजारात रिक्षा अनधिकृत उभ्या राहतात, त्यामुळे वाहतूक कोंडी होते, याकडे स्थानिक प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

प्रज्ञा बारटक्के, पर्यटक
Exit mobile version