मुरुड समुद्रकिनारी महोत्सवाचे आयोजन

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आतषबाजी

| मुरुड-जंजिरा/आगरदंडा | प्रतिनिधी |

मुरुड शहर हे ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले शहर आहे. येथील निसर्ग सौंदर्य व निळाशार समुद्र पर्यटकांना नेहमी आकर्षित करतो. मुरुड शहरातील व आजुबाजूच्या परिसरातील काही पर्यटकांना लुभवणारी स्थळे व समुद्रकिनारा अधिक सुंदर आणि पर्यटकांनाभावेल अशा पद्धतीने विकास करण्यासाठी आगामी काळात राज्य व केंद्र शासनाचा मोठा निधी येथे देण्याची लवकरच तरतूद केली जाईल. जगभरातील पर्यटक मुरुड शहरात येण्यासाठी व पर्यटकांचा ओघ वाढण्यासाठी मुरुड समुद्रकिनाऱ्याला ब्लू फ्लॅगचे नामांकन मिळवून देण्याचा आमचा पहिला प्रयत्न राहणार आहे. पुढील काळात मुरुड शहराच्या सर्वांगीण विकासावर भर देणार असल्याचे प्रतिपादन खासदार सुनील तटकरे यांनी केले.

यंदा खास लोकाग्रहास्तव मुरुड समुद्रकिनारी सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने मुरुड महोत्सव आयोजित करण्यात आला. त्यानिमित्ताने 31 डिसेंबर रोजी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मुरुड समुद्रकिनारी जमलेल्या हजारो पर्यटक व स्थानिकांच्या उपस्थितीत मुंबईच्या संगीता मेळेकर यांच्या वाद्यवृंदाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन नगराध्यक्षा आराधना दांडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.

मुरुड समुद्रकिनारी नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी संगीता मेळेकर प्रस्तुत ‌‘गाता रहे मेरा दिल’ हा म्युशिकल ऑर्केस्ट्रा ठेवण्यात आला होता. हा कार्यक्रम पहाण्यासाठी हजारोच्या संख्येने स्थानिक नागरिक व पर्यटक मोठ्या संखेने उपस्थित होते. या संगीतमय ऑर्केस्ट्राचा आनंद स्वतः खासदार तटकरे उपस्थित राहून घेतला. त्यानंतर मध्यरात्री फटाक्याची मोठी आतिषबाजी करून नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष फैरोज घलटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन मनोज भगत, मुख्याधिकारी सचिन बच्छाव, जिल्हा उपाध्यक्ष मंगेश दांडेकर, सुबोध महाडिक, हसमुख जैन, भाई सुर्वे, शाम कोतवाल, अजित कासार, नम्रता कासार, नगरसेवक रुपेश पाटील, नगरसेवक प्रांजली मकू, प्रीता चौलकर, प्रमिला माळी, आदेश दांडेकर, श्रद्धा अपराध आदींसह असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version