मुरुड बीच फेस्टिवलचे उत्साहात उद्घाटन

| मुरुड जंजिरा | वार्ताहर |

जागतिक पर्यटकांना आकाशातून मुरुड जंजिरा व जंजिरा किल्ला, पद्मदुर्ग किल्ला पाहता यावा व त्याचे चित्रण करता यावे म्हणून कोकण पर्यटन उद्योग संघाचे समन्वयक संजय यादवराव यांनी पॅराशूटमधून आकाशात उडण्याची सोयी केली आहे. आज उद्घाटनप्रसंगी अनेक पर्यटकांनी मुरुड आकाशातून पाहण्याचा आनंद घेतला. जागतिक पर्यटक मुरुडला यावेत, मुरुडचा आर्थिक विकास व्हावा व येथील युवकवर्गाला काम मिळावे यासाठी या महोत्सवाचे आयोजन केले आहे. हा महोत्सव 15 मेपर्यंत सुरु राहणार आहे, अशी माहिती संजय यादवराव यांनी दिली.

मुरुडमधील प्रकाश सरपाटील यांच्याबरोबरच येथील हॉटेल व्यावसायिक व समाजसेवक सर्वजण उपक्रमात सहभागी झाले आहेत. स्थानिक रोजगार आणि पर्यटन उद्योगवाढीच्या दृष्टीने गावकर्‍यांचा याला उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. साहसी पर्यटनामध्ये मोठे काम उभारणारे कोकणातील उद्योजक महेश सानप, मंगेश कोयंडे, प्रसाद चौलकर हे देखोल उपक्रमात सहभागी झाले आहेत. पॅराशूट चलावण्यासाठी भारताबाहेर दुबईमध्ये अशा स्वरूपाचा उपक्रम चालवणारे गोविंद येवले यांनी पर्यटकांना आकाशात नेऊन स्वर्गीय आनंद दिला व भीती नष्ट केली.

पॅराशूट जोडणी असलेल्या छोट्या विमानात बसून पर्यटकांना किल्ले आणि समुद्र किनार्‍यांचे विलोभनीय दर्शन घेता येणार आहे. या विमानात बसण्यासाठी वरसोली बीच व मुरुड बीच येथे ही सोय सुरु आहे.

Exit mobile version