मुरूड समुद्रकिनारी पर्यटकांची वर्दळ

। मुरूड-जंजिरा । वार्ताहर ।

मुरूड तालुक्यातील काशीद, मुरूड, नांदगांव सूुद्रकिनारी पर्यटन स्थळांवर मार्च महिन्यापासून पर्यटक येत नसल्याने शुकशुकाट होता; परंतु शनिवारी (दि.13) सकाळ पासून पर्यटकांचे पाय पुन्हा या पर्यटन ठिकाणाकडे वळल्याचे दिसून येत आहे. पर्यटकांची वर्दळ वाढती राहणार अशी माहिती काशीद येथील सूर्यकांत जंगम, मुरूड येथील मनोहर बैले, महेंद्र पाटील आदी रेस्ट हाऊस मालकांनी शनिवारी दुपारी बोलताना दिली.

पर्यटकांच्या वर्दळीने व्यवसायिकांना पुन्हा तेजीचे दिवस येणार असे स्पष्ट दिसून येत आहे. काशीद समुद्रकिनारी सुमारे 300 ते 400 वाहने सकाळी दाखल झाल्याची माहिती सूर्यकांत जंगम यांनी दिली. शैक्षणिक परीक्षा आटोपल्याने सुट्ट्या पडल्या आहेत. पर्यटक अनेक ठिकाणहुन जंजिरा जलदुर्ग, काशीद, मुरूड समुद्रकिनारे, नांदगाव येथील प्रसिद्ध सिद्धिविनायक देवस्थान, फणसाड वन्यजीव अभयारण्य, मुरूड दत्तमंदिर देवस्थान, बारशिव येथील रॉक बीच वर दाखल होत असल्याचे दिसत आहे. प्रसिद्ध काशीद आणि मुरूड बीच कडे शुक्रवारी रात्री पासून पर्यटक येताना दिसत होते. मुरूड बीचवर प्रशस्त पार्किंग जवळ जवळ पूर्ण होत आले असून वाहनांकरिता हे पार्किंग उपलब्ध असून सध्या तरी विनामूल्य असल्याने पर्यटकांना काळजी करण्याचे आता कारण नाही.

Exit mobile version