मुरुड समुद्रकिनारी मोटर पॅराग्लायडिंग

Exif_JPEG_420

पर्यटकांनी लुटला आनंद

| आगरदांडा | वार्ताहर |

पर्यटकांना आकर्षक करण्याकरिता मुरुड समुद्राकिनारी मोटार पॅराग्लायडिग सुरू झाली आसुन आज सकाळी अनेक पर्यटकांनी मोटार पॅराग्लायडिंग बसून आनंद लुटला. तर काहीनी पर्यटकांनी तर यांचा फोटो काढण्याचा आनंद लुटला.

मुरुड तालुका पर्यटनस्थळ असून लाखो पर्यटक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी ये-जा करित असतात. परंतु मुरुड समुद्राकिनारावर पर्यटकांसाठी जास्त सोयी सुविधा नसल्याने काही पर्यटक या ठिकाणी न थांबता पुढचा प्रवास करतात. यामुळे पर्यटकांची संख्या दिवसांनदिवस कमी होऊ लागली. याचा फटका येथील व्यावसायिकांना वर पडत होता. पर्यटकांच्या वाढीव करिता येथील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सातारा-वाई पसरणी येथील जी.पी.एडव्हेंचर स्पोर्ट्स च्या वतीने मुरुड समुद्र किनारी मोटर पॅराग्लायडिंग सुरू करण्यात आली आहे. या पॅराग्लायडिंग मध्ये एक पर्यटक व पायलट बसण्याची सुविधा असुन हा 100 फूट उंच भरारी घेते. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट दिला जातो.

Exit mobile version