| आगरदांडा | प्रतिनिधी |
सरत्या वर्षाला निरोप देत नविन नववर्षाच्या स्वागतासाठी मुरुड समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक जण विविध ठिकाणी फिरायला जात असतात. याच पार्श्वभूमीवर मुरुडला पर्यटकांनी चांगली पसंती दिली असून पर्यटकांनी समुद्रकिनारे बहरले आहेत.
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची करडी नजर असणार आहे. याकरिता पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली 3 पोलीस अधिकारी 70 पोलीस कर्मचारी व 30 होमगार्ड यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला असून, नविन वर्षाच्या स्वागतासाठी मुरूड समुद्रकिनारावरील हॉटेल, लॉजिंग, रेस्टॉरंट विद्युत रोषणाईने सजल्या आहेत. घोडागाडी, उंट स्वारी, बाईक स्वार, सायकलवर स्वारी करणे पर्यटकांनी पसंती केली आहे. समुद्रात उतरताना धोकादायक भागात पोहणे टाळा पोहताना सेफ्टी जॅक्टचा वापर करा असे आवाहन पर्यटकांना पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी केले आहे. रस्तावर वाहतुक व्यवस्था ही विस्कळीत होऊन नये त्याकरिता ट्राफीक पोलिसांची नेमणूक केली आहे. समुद्रकिनारा, सुर्वे नाका, परेश नाका, दस्तुरीनाका, शिघ्रे चेक पोस्ट, ऐतिहासिक जंजिरा किल्ला या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी दिली.







