| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड तालुक्यात रात्री पासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे काशिद ग्रामपंचायत हद्दीतील चिकणी गावाच्या मुख्य रस्त्यावरील पुलाला भगदाड पडल्याची घटना घडली आहे. या घटनेने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाला माहिती मिळताच विभागाचे अधिकारी रमेश गोरे व त्याची टिम घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला व त्याठिकाणी धोक्याची निशाणी लावण्यात आली आहे. यावेळी कृषीवल प्रतिनिधीनीशी बोलताना म्हणाले की चिकणी पुलाचा एक भाग कोसळला आहे. सध्या मुसळधार पाऊस पडत असल्याने तातडीने काम करता येणार नाही. पाऊस थांबला की कामाला सुरुवात करु. आता सध्या या ठिकाणी आम्ही धोक्याची निशाणी लावली असून, एक बाजुने रस्ता खुला केला असला तरी मोठ्या वाहनांना या रस्त्यावरून वाहतूक करता येणार नाही. तसे पत्र मुरुड पोलिस ठाण्यात देण्यात आले आहे. वाहन चालकांनी या ठिकाणावरुन गाडीचा स्पिड कमीत कमी ठेऊन गाडी चालवावी असे आवाहन यावेळी मुरुड सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता रमेश गोरे यांनी दिले आहे.