शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश; गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा नवा आदर्श
| मुरुड | प्रतिनिधी |
मुरुड गटातील शाळांनी यंदाच्या शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत शैक्षणिक गुणवत्तेची नवी उंची गाठली आहे. इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत 55 विद्यार्थी, तर इयत्ता सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत 17 विद्यार्थी पात्र ठरले आहेत. हे यश विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य आणि शाळांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांचे फलित आहे.
केवळ शिष्यवृत्ती परीक्षेतील यशच नव्हे, तर शैक्षणिक गुणवत्ता, डिजिटल शाळा, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि उपक्रमशील शिक्षणपद्धती या सर्व क्षेत्रांतही मुरुड गटातील शाळांनी उल्लेखनीय आघाडी घेतली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, विद्यार्थीकेंद्रित अध्यापन, विविध शैक्षणिक उपक्रम आणि सातत्यपूर्ण गुणवत्ता वृद्धीमुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययनात सकारात्मक व लक्षणीय बदल घडून आला आहे.
या उल्लेखनीय कार्याची दखल विविध स्तरांवर घेतली जात असून शिक्षकांच्या समर्पणाचे आणि शाळांच्या उत्कृष्ट कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. मुरुड गटात निर्माण झालेले हे शैक्षणिक नवचैतन्य इतर शाळांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे. या यशाबद्दल सर्व विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन समित्या तसेच शिक्षण विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि समर्पित शिक्षक यांच्या एकत्रित प्रयत्नातूनच उज्ज्वल भविष्य घडते, हे मुरुड गटाने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखविल्याबद्दल कौतुक करण्यात येत आहे.
