मुरुड मच्छीमारांचे तहसीलदारांना निवेदन

| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरुड नगरपरिषदेतर्फे समुद्राकिनारी सुरुचे बन ते एम.डी.डी.सी. हॉटेल व विश्रामबाग ते मुरुड कोळीवाडा या परिसरामध्ये सुशोभिकरणाचे काम सध्या सुरू आहे. सदरचे काम सुरू झाल्यापासून त्याठिकाणी वाळुचे उत्खनन होऊन संपूर्ण वाळु समुद्रामध्ये लोटली गेली आहे. त्यामुळे एकदरा खाडीजवळ मोठ्या प्रमाणात गाळ साचला झाले आहे. त्यामुळे होड्या आत-बाहेर काढण्याकरिता मच्छीमारांना कसरत करावी लागत आहे.

एकदरा व मुरुड खाडीलगत 300 ते 450 नौका असुन त्याचा मच्छीमारी व्यवसायावर उदरनिर्वाह आहे. त्यामुळे मच्छीमारांचे आर्थिक नुकसान होत आहे. चालु असलेल्या कामामुळे वाळुचा साठा दिवसेंनदिवस वाढत असल्याने खाडी बंद होण्याची परिस्थिती तयार झाली आहे. यांचा परिणाम पावसाळ्यात मिळणाऱ्या मच्छीवर झाला आहे. त्यामुळे जो पर्यंत बंधारा मंजुर होत नाही तो पर्यंत सुशोभिकरणाचे काम बंद करण्यात यावे. या संदर्भात रितसर निवेदन मुरुड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व तहसीलदारांना देण्यात आले.

यावेळी शुभांगी करडे, पांडुरंग आरेकर, जगन्नाथ वाघरे, महेंद्र गार्डी, यशवंत सवाई, प्रकाश सरपाटील, चिंतामणी लोदी, धुर्वा लोदी, मनोहर जंजिरकर आदिंसह मान्यवर निवेदन देतेवेळी उपस्थित होते.

Exit mobile version