| आगरदांडा | प्रतिनिधी |
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, आदर्श कल्याणकारी राजा, जाणता राजा श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या 396 व्या जयंतीचे औचित्य साधून मुरुड- जंजिरा नगरपरिषदेच्यावतीने नगरपरिषद कार्यालय, लक्ष्मीखार व दत्तवाडी येथील शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्याला नगराध्यक्षा आराधना दांडेकर व उपनगराध्यक्ष विरेंद्र भगत यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करुन शिवरायांना मानवंदना देण्यात आल्यानंतर राजे छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव, जय जिजाऊ, धर्मवीर संभाजी महाराज की जय अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी मुरुड जंजिरा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष आराधना दांडेकर, उपनगराध्यक्ष विरेंद्र भगत, मुख्याधिकारी सचिन बच्छाव, प्रशासकीय अधिकारी नंदकुमार आबंतेकर, सतेज निमकर, पांडुरंग आरेकर, मनोज भगत, आदेश दांडेकर, रुपेश पाटील, मनिष विरूकुड, रुपेश रणदिवे, प्रिता चौलकर, नगमाना खानजादे, यास्मिन कादिरी, देवयानी गुरव, प्रमिला माळी, श्रध्दा अपराध, प्रमोद भायदे, अनिकेत वाजे, अनिकेत जगदाळे, सोनल पाटील, गजानन भुसाणे, प्रशांत दिवेकर, संजय बामगुडे, अरविंद गायकर, प्रशांत कासेकर, सुदेश माळी, जयकृष्ण भिसे आदिंसह शिवप्रेमी उपस्थित होते.







