मुरुड पालिकेत आता 20 नगरसेवक

नवीन निकषानुसार तीन वॉॅर्ड वाढणार

मुरुड | वार्ताहर |
आगामी काळात होणार्‍या नगरपालिका निवडणुकीत मुरुडमधील नगरसेवकांची संख्या 20 होणार आहे.सध्या 17 नगरसेवक आहेत त्यात तीन वाढणार आहेत.
सन 1888 साली मुरुड नगरपरिषदेची स्थापना झालेली असून सदरची नगरपरिषद ही नवाब कालीन असून कोकणातील सर्वात जुनी नगरपरिषद म्हणून या नगरपरिषदे चा नावलौकिक आहे. नगरपरिषद हद्दीमधील 12 हजार 126 लोकसंख्या असून येथे नगरसेवकांची संख्या ही 17 होती परंतु शासनाच्या निकशाप्रमाणे वाढीव लोकसंख्येमुळे आता ही नगरसेवक संख्या 20 झाली आहे. क वर्ग नगरपरिषदेत प्रथमच तीन नगरसेवकांची संख्या वाढली आहे. याबाबत नगरपरिषदेचे कार्यालयीन अधीक्षक परेश कुंभार यांची भेट घेतली असता त्यांनी सांगितले की नवीन निकशाप्रमाणे मुरुड नगरपरिषदेत नगरसेवक संख्या 17 होती ती आता 20 करण्यात आली आहे. याबाबत निवडणूक आयोगाचे पत्र मुरुड नगरपरिषदेस प्राप्त झाले असून याबाबतची पुढची कार्यवाही आम्ही सुरू केली आहे मुरुड नगरपरिषदेचे 20 नगरसेवक संखया झाल्याने 10 प्रभागमध्ये निवडणूक घेण्यात येणार आहे . राज्य निवडणूक आयोगाकडून नगरपंचयतींचा आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर झाल्याने तेथील आरक्षण काढण्यात आले आहेत तर नगरपरिषद चे कोणत्या प्रभागात काय आरक्षण असेल हा कार्यक्रम अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही, तो जाहीर होताच आरक्षण कार्यक्रम घेणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली आहे.

Exit mobile version