ठासणीची बंदूक दुचाकीवरून घेवुन जाणा-याला अटक : मुरूड पोलिसांची कारवाई

मुरुड-जंजिरा | प्रकाश सद्रे |

कोव्हीड त१९ आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संचारबंदी व तालुक्यात मनाई आदेश असतानाही अनधिकृत रित्या ठासणीची बंदूक घेवून मोटार सायकलवरून घेवुन जाणा-या जनार्दन जंगम वय वर्ष २०, संदीप वाघमारे, महेश वाघमारे यांना मुरूड पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणी त्यांच्या कडील बंदूक व हिरोहोडा कंपनीची पलसर मोटारसायकल क्रमांक-एम.एच.०६-५३२८ही गाडी जप्त करण्यात आली असल्याची माहिती मुरूड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक- परशुराम काबंळे यांनी दिली.

याबाबत मुरूड पोलीस ठाण्यातून अधिक माहिती देण्यात आली की, रविवारी रात्रीच्या सुमारास मुरूड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक- श्रीकांत म्हात्रे , पोलिस शिपाई- सागर रसाळ, पोलिस शिपाई- सुरेश वाघमारे,पोलिस हवालदार- वैभव सांळुके, पोलीस शिपाई- तडवी , होमगार्ड- मंगेश कौलकर हे ठाणे अंतर्गत गस्त घालत होते. त्या दरम्यान मुरूड- शिघ्रे- केळघर रोडनी तीन इसम हिरोहोडा कंपनीची पलसर मोटारसायकल क्रमांक-एम.एच.०६-५३२८ या मोटार सायकल वरून एक बंदुक घेवुन शिघ्रेच्या दिशेने येत आहेत यांची माहिती मिळाली.पोलीस उपनिरिक्षक- श्रीकांत म्हात्रे यांनी त्वरीत सापळा रचुन सदर एका संवशीत मोटार सायकल वरून तीन इसमाना थांबुन त्याची झडती घेत असताना त्या मधील दोन इसम अंधाराचा फायदा घेत जंगलात पळून जाण्यास यशस्वी झाले. त्यामधील एकाला पकडण्यास यश आले. त्यावेळी त्याची तपासणी केली आसता त्याच्याकडे एका विना परवाना एक नळची डासनीची बंदुक सापडल्याने त्याच्या वर मुरुड पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम ३(१)२५अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.फरार आसलेले दोन आरोपीना पुन्हा सकाळी पोलीस उपनिरीक्षक- श्रीकांत म्हात्रे यांनी सापळा रचून शिघ्रे आदिवासी वाड्यावरून अटक करून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर तिघांना न्यायालयात हजर करण्यात आले.

पुढील तपास मुरुड पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक- परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक- श्रीकांत म्हात्रे करीत आहेत.

Exit mobile version