मुरुड तापले : पारा 41 अंशाच्यापार

Exif_JPEG_420

थंड पेयांची मागणी वाढली
। कोर्लई । वार्ताहर ।
होळीचा सण जसजसा जवळ येत आहे, तसतसा हवामानात बदल होत असून रविवारी मुरुडमध्ये उष्णतेमुळे पारा चढला आणि तापमान 40चा आकडा पार करून गेल्याने अंगांची काहीली वाढली अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. तापमान वाढल्याने शहरातील थंड पेयांची मागणी वाढली असल्याचे चित्र दिसून आले. उसाचा रस, लिंबू सरबत, नारळपाणी याला मागणी वाढली आहे.
राज्यामध्ये उष्णतेची लाट आली असून अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला. याचाच परिणाम रायगड जिल्ह्यातील वातावरणावर झाला असून परिणामी तालुक्यातील काही ठिकाणी वादळासह पाऊस झाला आहे. मुरुडमध्ये रविवारी सकाळी बारा नंतर हवामान वाढून उष्णतेचा पारा 40 पार करून गेल्याने अंगांची काहीली वाढली. प्रचंड उकाड्याने नागरिक त्रस्त झाले. यामुळे थंड पेयांची मागणी वाढली होती. दरम्यान राज्यात हवामान खात्याने पावसाचा इशारा देण्यात आला होता. तालुक्यात अधिक उष्णता वाढल्यास होळी सणाच्या आसपास पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.

Exit mobile version