मुरुडचा पारा वाढला

Thermometer Sun 40 Degres. Hot summer day. High Summer temperatures

| मुरुड | वृत्‍तसंस्था |

मुरुडचे तापमान 45 अंशाच्या वरती गेलेल्या पाहाव्यास मिळवले आहे. अक्षरशा सूर्यदेव आग ओकत असल्याचा अनुभव मुरुडकरांना मिळाला आहे. ग्लोबल वॉर्मिंगचा इशारा मिळत असल्याने वेडीच उपायोजना करण्याची गरज आहे. वाढते प्रदूषण, औद्योगीकरण, शहरात होणारे गल्लीबोळातील रस्ते, खेडेगावातून होणारे अंतर्गत रस्ते, मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड, आधुनिकीकरणाच्या नावाखाली जमीनदोस्त होणारे डोंगर हे जर वेळीच थांबले नाही तर यंदा तापमान 45ओ पार तर पुढल्या वर्षी 55ओ पार होणार तर वेळीच उपाययोजना केली नाही तर मानव प्रजाती नष्ट व्हायला वेळ लागणार नाही.

सकाळी 8 वाजताच पारा 36ओ वर गेला दुपारी 45.2ओ वर चढला त्यामुळे शहरातच नव्हे तर गावखेड्यातून सुद्धा घराबाहेर पडणारी सर्व सामान्य माणस घरातच बसून राहिले. त्यामुळे संपूर्ण बाजारपेठेत कमी प्रमाणात वर्दळ दिसत होती. रिक्षा चालकांनी सुद्धा उन्हात प्रवासी मिळत नसल्याने रिक्षा घरीच बंद ठेवने पसंत केले आहे. या वेळी प्रथमच मुरूडचा पारा इतया प्रचंड प्रमाणात चढला होता. याचे कारण मुरुड शहरातील विकास कामे यामध्ये शहरातील मातीचे रस्ते नष्ट झाले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात पाणी जमिनीत मुरणार नाही त्यामुळे उष्णता कमी होण्या ऐवजी वाढत जाणार अशी खंत जनमानसांतुन व्यक्त होत आहे. पुन्हा एकदा शहरातील, ग्रामीण भागातील रस्ते मातीचे करावे लागतील त्यामुळे तापमान नियंत्रित करण्यासाठी मदत होईल अशी मागणी जनमानसातुन जोर धरू लागली आहे.

Exit mobile version