तोराडी मोहल्ला मुस्लिम कार्यकर्त्यांचा शेकापमध्ये प्रवेश

। म्हसळा । प्रतिनिधी ।
म्हसळा तालुक्यातील तोराडी मोहल्ला येथील राष्ट्रवादीच्या मुस्लिम कार्यकर्त्यांनी शेकापचे मा आमदार पंडित पाटील यांचा उपस्थितीत शेकाप मध्ये प्रवेश केला आहे. शेकाप ने पंडित पाटील यांची श्रीवर्धन मतदार संघाच्या संपर्क चिटणीस पदी निवड झाल्यानंतर नुकताच त्यांनी श्रीवर्धन म्हसळा तालुक्याचा दौरा केला होता.या दौर्‍यात श्रीवर्धन मतदार संघात शेकापला एक नंबरचा पक्ष बनवण्याचा निर्धार पंडित पाटील यांनी केला. त्याची प्रचिती म्हणून तोराडी येथील मुस्लिम कार्यकर्ते इक्बाल हजवाने, अस्लम हजवाने, मजीद हजवाने, अजीम हजवाने, लियाकत हजवाने, अतिक हजवाने, कादिर मोहमद हजवाने, मुखत्यार हजवाने, अजीम मुकादम असंख्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा त्यांनी शेकापमध्ये प्रवेश घडवून आणला.राष्ट्रवादीच्या एका अल्पसंख्याक नेत्याने जाणीवपूर्वक त्रास दिल्याने आम्ही शेकाप मध्ये प्रवेश करीत आहोत असे इक्बाल हजवाने यांनी या पक्ष प्रवेशावेळी सांगितले. पंडित पाटील यांच्या श्रीवर्धन मतदार संघातील दमदार एन्ट्रीने राष्ट्रवादीची चिंता वाढली असणार हे नक्की.

Exit mobile version