मुस्लिम, बौद्ध, कुणबीसमाजाची तटकरेंवर नाराजी


| महाड | वार्ताहर |

रायगड लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून राष्ट्रवादीचे सुनील तटकरे आणि इंडिया आघाडीकडून शिवसेनेचे अनंत गीते रिंगणात आहेत. तटकरेंना निवडून येण्यासाठी मुस्लिम, बौद्ध आणि कुणबी मतांची टक्केवारी निर्णायक ठरणार आहे. मात्र, विविध प्रकारची आमिषे दाखवून देखील मतदार आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे दिसून येत आहे. तटकरेंनी यापूर्वी राज्य सरकारमध्ये विविध मंत्री पदे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भूषवली आहेत. जिल्हा परिषद सदस्य ते कॅबिनेट मंत्री पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद अशी विविध पदे तटकरे यांनी सांभाळली आहेत. मात्र, राजकारण करताना तटकरे यांनी आपल्या सोबत काम करणार्‍या विविध नेत्यांना आणि पक्षांना धोका देत आपला स्वार्थ साधण्याचा काम केलं आहे. त्यांच्या या गुणाबाबत अनेक वेळा विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी स्थानिक आमदारांनी टीकेची जोड देखील उठवले आहे.

तटकरे यांनी शरद पवारांची साथ सोडल्यानंतर आणि भाजप बरोबर हात मिळवणी केल्यामुळे रायगड लोकसभा मतदारसंघ त्यांच्याबाबत प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. ही नाराजी या निवडणुकीत मतदानाच्या माध्यमातून मतदार काढतील असा संशय निर्माण झाल्याने महाविकास आघाडीकडून भाजपचे बडे नेते रायगड लोकसभा मतदारसंघात तळ ठोकून आहेत. एकीकडे ज्या भरत शेठ गोगावले यांनी यापूर्वी तटकरे यांच्यावर टीकेची जोड उठवली होती आणि मोदींना पाठिंबा देण्यासाठी गीते यांना मतदान करा असे आवाहन केले होते तेच भरत गोगावले आता मोदींना पाठिंबा देण्यासाठी तटकरे यांना मतदान करा असे गावोगावी सांगत आहेत त्यांच्या या दुटप्पी आवाहनामुळे ग्रामीण भागातील जनता नाराज झालेले आहे. तोंडावर कोणीही बोलत नसले तरी मत पेटीतून ही नाराजी व्यक्त होणार असल्याचे सांगितले जात आहे. भाजप विरोधी वातावरणाचा फटका सुनील तटकरे यांना बसण्याची शक्यता आहे. स्थानिक पातळीवरील राष्ट्रवादीचे नेते, आठवले गटाचे पुढारी गावोगाव फिरत आहेत. मात्र, मुस्लिम बौद्ध आणि कुणबी समाजामध्ये त्यांना फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे, यामुळे आता वेगवेगळी आमिष दाखवण्याचा प्रयत्न होत आहे मात्र ही आमिष देखील धुडकावली जात आहेत.

Exit mobile version