सांगडे क्रिकेट स्पर्धेत मुठवली अ संघ विजेता

| खांब | वार्ताहर |

रोहा तालुका शिव छत्रपती क्रिकेट असो. धामणसई विभागांतर्गत संपन्न झालेल्या क्रिकेट स्पर्धेत जय भवानी मुठवली अ संघाने सर्वोत्तम कामगिरी करून स्पर्धेतील अंतिम विजेतेपदाचा बहुमान पटकावला.

युवक मंडळ सांगाडे व शिव छत्रपती क्रिकेट असोसिएशनच्या वतीने येथे प्रथमच आयोजित क्रिकेट स्पर्धेत जय भवानी गावठाण संघ उपविजेता ठरला. तर, मुठवली खु. ब व मालसई संघांनी अनुक्रमे तृतीय व चतुर्थ क्रमांक पटकावले. या स्पर्धेत सामनावीर म्हणून सौरभ ठाकूर, उत्कृष्ट क्षेत्रक्षण किरण तुपकर व उत्कृष्ट गोलंदाज म्हणून प्रणय दळवी यांना उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी युवक मंडळ सांगाडे व शिव छत्रपती क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

Exit mobile version