| खांब | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील शिव छत्रपती असोशियन मुठवली खुर्द (बी) येथे संपन्न झालेल्या क्रिकेट स्पर्धेत मुठवली संघाने विजेतेपद पटकावून विजयी चषकावर आपले नाव कोरले आहे.
शिव छत्रपती असोशिएशन यांच्या सहयोगाने विभागवार ठिकठिकाणी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करून क्रिकेट खेळाला प्रोत्साहन दिले जात आहे. त्याच अनुषंगाने येथे संपन्न झालेल्या या स्पर्धेत द्वितीय क्र. जय भवानी गावठाण, तृतीय व चतुर्थ क्र. अनुक्रमे जाणता राजा पिंगळसई व जी.सी.सी. पिंगळसई यांनी पटकावले. तर, मालिकावीर म्हणून सौरभ ठाकूर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण शिवते शिंदे, उत्कृष्ट फलंदाज विवेक जाधव व उत्कृष्ट गोलंदाज म्हणून राज कदम यांना समाजसेवक भरत राजे देशमुख, उद्योजक सुभाष गराटे साहेब, आदर्श शिक्षक अरुण आगळे, युवा कार्यकर्ते महेश तुपकर, सरपंच मारुती तुपकर आदींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी गाव अध्यक्ष संजय तुपकर, ग्रा.पं. सदस्य तुळशीराम शेळके, सुनील शेळके, चंद्रकांत शिंदे, तानाजी ठमके, सतीश ठाकूर, मंगेश तुपकर, रवींद्र शिंदे, संतोष तुपकर, संतोष शेळके, नरेश खंडागळे, दिनेश तुपकर, श्याम सावंत, सुरेश शिंदे, गावातील ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.