| खांब | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील मुठवली खु. येथे शिव छत्रपती क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने खेळविण्यात येत असलेल्या क्रिकेट सामन्यांचे शानदार उद्घाटन करण्यात आले.
ओबीसी समन्वय समिती जि.अध्यक्ष सुरेश मगर, तालुका कुणबी युवक अध्यक्ष अनंत थिटे, जेष्ठ नेते खेळू ढमाळ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आलेल्या या उद्घाटनप्रसंगी गोपाळ खरिवले, दिपक शिंदे, भरत राजे देशमुख, मारूती तुपकर, अनंत शेळके, महेश तुपकर, योगेश शिंदे, येनाजी शिंदे, संजय तुपकर, मंगेश तुपकर, अनिल आयरे, जीवा जाधव, नरेश मालुसरे, सतिश ठाकूर, संदेश तुपकर, सहदेव शिंदे, नामदेव शिंदे, गणेश शिंदे, श्याम सावंत, प्रमोद ठमके, सुरेश शिंदे, नरेश तुपकर, दिनेश तुपकर आदी प्रमुख मान्यवरांसह मोठ्या संख्येने क्रीडाप्रेमी नागरिक उपस्थित होते.