न्यायदेवतेवर माझा विश्‍वास; पाबळ सरपंचांचा दावा

| पेण | प्रतिनिधी |

पेण तालुक्यातील पाबळ ग्रामपंचायतीच्या सरपंच राजेश्री जाधव यांच्या जातीचा दाखला अवैध ठरविणार्‍या जिल्हा जात पडताळणी समितीच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्‍वास असून, मला योग्य तो न्याय मिळेल, असा दावा राजेश्री जाधव यांनी केला आहे.

गेले कित्येक वर्ष शेतकरी कामगार पक्षाचे निर्विवाद वर्चस्व असून या गोष्टीमुळे विरोधकांच्या पोटात पोटशुळ उठला होता. त्यामुळे सरपंच राजेश्री जाधव यांच्या विरुद्ध सतत काहीना काही कुरघोडी करण्यात विरोधक समाधान मानत होते. जिल्हा जात पडताळणी समितीकडे सरपंच राजेश्री जाधव यांचा जातीचा दाखला चुकीचा असल्याची तक्रार केली होती. या अनुषंगाने जिल्हा जात पडताळणी समितीने दाखला अवैध असल्याचे घोषित केले. मात्र या निर्णयाविरुद्ध सरपंच राजेश्री राजाराम जाधव यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आणि आपली बाजू मांडली. न्यायालयाने देखील सरपंचाची बाजू ऐकूण जिल्हा जात पडताळणी समितीने दिलेल्या निकालाला स्थगिती दिला आहे. अशी माहिती सरपंच राजेश्री जाधव यांनी कृषीवलशी बोलताना दिली तसेच त्यांनी पुढे सांगितले की, माझा न्यायदेवतेवर पूर्ण विश्‍वास आहे. सत्याचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही. माझा जात प्रामणपत्र हा योग्य असून उच्च न्यायालयात मला न्याय मिळेल,असे त्या म्हणाल्या.

Exit mobile version