‘माझे पहिले मतदान देशासाठी’ उपक्रम उत्साहात

| तळा | वार्ताहर |

गोपीनाथ महादेव वेदक प्रतिष्ठानचे जी. एम. वेदक कॉलेज ऑफ सायन्स तळा येथे राष्ट्रीय सेवा योजना व मतदान नोंदणी कक्ष यांच्यामार्फत ‘माझे पहिले मतदान देशासाठी’ हा उपक्रम साजरा करण्यात आला होता. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन बंगाळे यांनी ‘माझे पहिले मतदान देशासाठी’ या विषयावर विद्यार्थ्यांना माहिती दिली. त्याचबरोबर राष्ट्रीय सेवा योजनेतील कार्यक्रमाधिकारी डॉ. शेख यांनी या कार्यक्रमाची प्रस्तावना केली. तर स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य पुरुषोत्तम मुळे यांनी विद्यार्थ्यांना मतदान जनजागृती केली. या कार्यक्रमादरम्यान निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्याच बरोबर मतदान नोंदणी कक्ष सेल्फी पॉईंटचेही आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी जी. एम. वेदक कॉलेज ऑफ सायन्स महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. सचिन बंगाळे यांनी केले.

Exit mobile version