गाडी खाली फेकल्याचा नातेवाईकांचा आरोप
| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ रेल्वे स्थानका दरम्यान त्रिवेंद्रम एक्स्प्रेसखाली तरूणाचा अपघात होऊन मृत्यू झाला आहे. मयत तरूणाच्या आईने आपल्या मुलाला पाच ते सहा लोकांनी गाडी खाली फेकल्याचा आरोप केला आहे. कर्जत रेल्वे पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्युची नोंद करण्यात आली आहे. नेरळ कर्जत स्थानकादरम्यान रोहीत शिंदे या 19 वर्षाय तरूणाला डाऊन मार्गावरील गाडी क्र.16331 त्रिवेंद्रम एक्स्प्रेस या गाडीने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला होता.
मृत तरूणाची आई शेवंती राजन शिंदे यांनी आपल्या मुलाचा अपघात झाला नसून त्याला काही तरुणांनी गाडी फेकून दिल्याचा आरोप केला.सदर मृत तरूण आणि त्याचे आईवडिल हे रेल्वे लाईन मध्ये कंत्राटी कामगार असून सध्या त्यांचे अनुभाग अंभियंता (रेलपथ) नेरळ कार्यालयाच्या जवळपास आप रेल्वे लाईनच्या बाजूला काम सुरू आहे. त्याच ठिकाणी ते कुटुंब झोपडी मध्ये राहतात.मृत तरूणाची आई वडिल यांच्याकडून होत असलेल्या आरोपानुसार ते राहात असलेल्या ठिकाणी जी.आर पी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी यादव यांनी आपले कर्मचारी पोलीस नाईक जयेश कदम, आर पी एफ उपनिरीक्षक कुलदीप, होमगार्ड राहुल पाटील, होमगार्ड हरिष तिटकरे पोहचले होते.त्यावेळी ते कुटुंब राहत असलेल्या झोपड्या पाडण्यात आल्या होत्या सामान आणि रक्तांचे डाग आढळून आले.
त्यामुळे रोहित शिंदे या तरुणास आधी मारहाण करून नंतर गाडी खाली दिले असावे असा संशय आणि आरोप त्याच्या नातेवाईक यांनी केला आहे. त्यामुळे रोहित शिंदे या तरुणाचा मृत्यू हा घातपात आणि खुनाचा असल्याचा संशय व्यक्त केला आहे.त्या दृष्टीने रेल्वे पोलीस यांनी यांनी आपल्या तपासा दरम्यान गाडी क्र.16331 त्रिवेंद्रम एक्सप्रेस या गाडीचे लोक पायलट यांना फोन व्दारे या घटने बदल विचारणा तेव्हा सदर तरूण हा लाईन पार करताना त्याला गाडीने उडविले असल्याचा व हा अपघात झाला असल्याचे सांगितले आहे. त्यानुसार रेल्वे जी.आर पी कर्जत चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी यादव यांनी सर्व शक्यता तपासून पाहिल्या आहेत.