नाभिकाने ग्राहकावर केला वस्ताऱ्याने वार

। पनवेल । प्रतिनिधी ।

पैशाच्या वादातून नाभिकाने एका ग्राहकावर वस्ताऱ्याने गंभीर वार केल्याची घटना नवीन पनवेल येथे घडली आहे. नवीन पनवेल येथील मंगलमूर्ती मार्केटमधील दीपक हेअर कटिंग सलून येथे रवींद्र कल्लाप्पा वाघमारे (35) हा केस कटिंग करण्यासाठी गेला होता. यावेळी येथील कामगार सीठा रघुवीर सिंग (वय 29 वर्ष, रा. देवद) याने ‘आधी पैसे दे, मग तुझे केस कापतो’ असे सांगितले. या कारणावरून रविंद्र व आरोपी सिठा सिंग यांच्यात वाद झाला. यावेळी आरोपी सीठा रघुवीर सिंगने त्याच्या हातातील दाढी करण्याच्या वस्तऱ्याने रवींद्र याच्या उजव्या डोळ्याच्या खालील बाजूपासून उजव्या गालावर ओठापर्यंत वार करून गंभीर दुखापत केली. रवींद्र वाघमारे यांच्यावर एमजीएम हॉस्पिटल येथे उपचार सुरु आहेत. या प्रकरणाचा तपास खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय परशकर करत आहेत. याप्रकरणी आरोपी सिठा सिंग याला अटक करण्यात आली आहे.

Exit mobile version