नाडकर्णी आजी स्मृती वक्तृत्व स्पर्धा

नेरळ विद्या मंदिर शाळेने जिंकली

| नेरळ | प्रतिनिधी |

नेरळ ममदापूर येथील विद्या मंदिर मंडळाच्या वतीने शाळेसाठी जमीन दान करणार्‍या नाडकर्णी आजी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली जाते. तीन तालुक्यातील माध्यमिक शाळांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेतील तालीम ढाल आणि सांघिक विजेतेपद नेरळ विद्या मंदिर शाळेने पटकावले.

कर्जत, खालापूर आणि वांगणी परिसरातील माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय यांच्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा आयोजित केली जाते. तीन तालुक्यातील माध्यमिक गटात 12 आणि कनिष्ठ महाविद्यालय गटात 11 स्पर्धक यांनी सहभाग घेतला होता. माध्यमिक विद्यालय गटात वक्तृत्व स्पर्धेचा मोबाईल मुळे हरवतेय का बालपण हा विषय होता आणि त्या स्पर्धेत प्रथम क्रमांक विभागून देण्यात आला. त्यात गीत गजानन गजानन भंडारे (नेरळ विद्या मंदीर)आणि संतोषी शौद्र रुपवते (नेरळ किया मंदिर), द्वितीय क्रमांक देखिका दिलीप कर्णिक (विद्या सिकास मंदिर) तर तृतीय क्रमांक तन्मय दिनेश शेट (अभिनव ज्ञानमंदिर, कर्जत) आणि उत्तेजनार्थ चैतन्या सुभाष पेरणे विद्या विकास मंदिर यांनी क्रमांक पटकावले.

कनिष्ठ महाविद्यालय गटासाठी वाचन संस्कृती लोप पावली आहे काय? हा विषय ठेवण्यात आला होता. नेरळ विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रथमेश नंदकुमार इंगळे याने प्रथम आणि द्वितीय क्रमांक तसेच राधिका यशवंत भेजरे याच महाविद्यालयाची स्मरणिका संतोष खडे ही द्वितीय आणि तृतीय क्रमांक जिज्ञा मंगेश शिंदे (नेताजी पालकर विद्यालय उत्तेजनार्थ पूजा बापू खोडे (विद्या निकाय मंदिर, नेख) यांना क्रमांक देण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्रद्धा भिडे पुणे आणि आनंद जाधव मुरबाड यांनी काम पाहिले.

स्पर्धेची सांघिक ढाल सांघिक कामगिरीवर जाहीर करण्यात आली. त्यात नेरळ विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालय यांनी सर्वाधिक क्रमांक पटकावले आणि त्यामुळे त्यांना नाडकर्णी स्मृति वक्तृत्व स्पर्धेची तालीम ढाल देण्यात आली. तर सांघिक दुसरा क्रमांक नेरळ येथील विद्या विकास शाळेने पटकावला. स्पर्धकांना विवेकानंद पोतदार यांचा हस्ते सन्मानीत करण्यात आहे. विद्या मंदिर मंडळाचे संयुक्त सचिव विवेकानंद पोतदार,संस्थेचे विश्‍वस्त डॉ मिलिंद पोतदार तसेच कार्यकारिणी माजी सदस्य पिंपुटकर, शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद विचवे, वरीष्ठ महाविदयलय प्राचार्य डॉ. नंदकुमार इंगळे, डी. एस. गजभिये (पर्यवेक्षक), शिक्षक-पालक संघाचे उपाध्यक्ष राजू झुगरे, राखी बोलदार आदी उपस्थित होते.

Exit mobile version