नागांव ग्रामपंचायत सदस्य अनिरुद्ध राणे यांचे निधन

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील नागांव ग्रामपंचायतीचे सदस्य अनिरुद्ध राणे यांच्या अचानक निधनाने संपुर्ण नागांवमध्ये शोककळा पसरली आहे. मनमिळाऊ स्वभाव, साधेपणा, समाजाप्रती आपुलकी, सामाजिक कामात कायम अग्रेसर असणारा शेकापचा युवा कार्यकर्ता अनिरुद्ध याने अचानक एक्झिट घेतल्याने खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. शेकापचे युवा नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या अनिरुद्धच्या अकाली निधनाने राजकीय क्षेत्रात मोठी हानी झाली आहे. पुरोगामी विचारांसाठी त्यांनी काम सुरू केले होते. नागावमधील युवकांना शेकापच्या विचारांसोबत आणण्याचे विशेष कार्य त्यानी केले. शनिवारी (दि.13) सायंकाळी त्याच्या निधनाचे वृत्त समजताच साऱ्यांनीच हळहळ व्यक्त केली.

Exit mobile version