| पाली/गोमाशी | प्रतिनिधी |
श्री सोमजाई क्रीडा मंडळ गोमाशी यांच्यावतीने आणि सुधागड तालुका स्पोर्ट्स असोसिएशनच्या मान्यतेने तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे भव्य दिव्य आयोजन रविवार ता.23 रोजी गोमाशी येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत तालुक्यातील नामवंत संघानी आपला प्रवेश नोंदविला होता. या कबड्डी स्पर्धेसाठी क्रीडाप्रेमींनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. या स्पर्धेचे देखणे नियोजन या मंडळाच्यावतीने करण्यात आले होते. तसेच सर्व खेळाडू आणि क्रीडा रसिकांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. या स्पर्धेतील अंतिम लढत भैरवनाथ नागशेत विरुद्ध कालभैरव भार्जे या संघात झाली .स्पर्धेच्या अंतिम लढतीत नागशेत हा संघ अविकांत साळुंकेच्या मार्गदर्शनाखाली विजयी झाला. या संघास रोख रक्कम 15 हजार व आकर्षक चषक तर द्वितीय क्रमांक भार्जे या संघास 10 हजार व आकर्षक चषक , तृतीय क्रमांक चिवे तर चतुर्थ क्रमांक रणधुरंदर पाली या संघांना प्रत्येकी 7 हजार व आकर्षक चषक देऊन मंडळच्या वतीने गौरविण्यात आले.
या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू राज बेलोसे , सर्वोत्कृष्ट चढाई दिपेश भोय ,उत्कृष्ट पक्कड शुभम शिंदे, पब्लिक हिरो स्वप्निल भिलारे या सर्व खेळाडूंना मंडळाच्या वतीने आकर्षक बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले.या सर्व स्पर्धेचे धावते समालोचन साहिल खैरे यांनी केले.







