नायरला धोनीची पसंती असे : अश्विन

| चेन्नई | वृत्तसंस्था |

चेन्नई सुपर किंग्जमध्ये करुण नायर अंबाती रायडूची जागा घेऊ शकतो, असा विश्वास आर. अश्विनला आहे. तो म्हणाला, मला वाटते सीएसके करुण नायरसाठी बोली लावेल. कारण, संघ अंबाती रायुडूच्या बदली खेळाडूच्या शोधात आहे. चौथ्या क्रमांकावर शाहरुख खान त्याच्यासाठी योग्य नाही. चेन्नईचा संघ चौथ्या क्रमांकावर कोणाला खेळवेल हे मला माहीत नाही.

अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेने गेल्या वेळी आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केली होती. यानंतर त्याने टीम इंडियातही पुनरागमन केले. यावेळी चेन्नई संघाला अंबाती रायुडूची उणीव भासेल. रायुडू निवृत्त झाला असून, अंतिम संघात त्याची जागा रिक्त झाली आहे. आता धोनी कोणत्या खेळाडूला संधी देतो हे पाहायचे आहे, असे रविचंद्रन अश्विनने मत मांडले आहे.

रविचंद्रन अश्विन म्हणाला, करुण नायर हा खेळाडू आहे, जो फिरकी गोलंदाजांविरुद्ध चांगला खेळू शकतो. महेंद्रसिंग धोनीला असे खेळाडू आवडतात. माझ्या मते करुण नायर त्यांच्यासाठी योग्य आहे. मनीष पांडेला चेन्नईमध्ये फिरकी गोलंदाजांविरुद्ध फारसे खेळताना पाहिलेले नाही, पण करुण नायरने चेन्नईत खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात त्रिशतक झळकावले आहे. अश्विनला असेही वाटते की सनरायझर्स हैदराबाद ही अशी फ्रँचायझी आहे, जी करुण नायरसाठी रस दाखवू शकते.

Exit mobile version