नैतिक सोळंकीची महाराष्ट्राच्या संघात

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

विजय मर्चंट करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या 16 वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट संघात रायगडच्या नैतिक भरत सोळंकी याची निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्राचा संघ सूरत येथे विजय मर्चंट करंडक स्पर्धा खेळण्यासाठी सोमवारी (दि.28) पुणे येथून रवाना होईल. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशचे अध्यक्ष चंद्रकांत मते व सर्व सदस्यांनी नैतिक सोळंकीचे अभिनंदन केले व त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version