| नागोठणे | वार्ताहर |
नागोठण्याजवळील वाघळी येथील रहिवासी नामदेव लक्ष्मण कदम (79) यांचे रविवार दि. 24 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास वृध्दापकाळाने निधन झाले. वाघळी येथील सामाजिक कार्यकर्ते महेंद्र कदम यांचे ते वडील तर सामाजिक कार्यकर्ते तुकाराम कदम यांचे मोठे काका होत. दिवंगत नामदेव कदम यांच्या पार्थिवावर सोमवार दि.25 नोव्हेंबर रोजी वाघळी येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी लक्ष्मीबाई कदम, दादू व महेंद्र ही दोन विवाहित मुले, सुनिता अनंत साळुंखे व शांता निलेश जाधव (दोन्ही रा. खोपोली) या दोन विवाहित मुली यांच्यासह सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. कै.नामदेव कदम यांचे दशक्रिया विधी बुधवार दि. 4 डिसेंबर रोजी उध्दर-पाली येथे होणार असून, उत्तरकार्य विधी शुक्रवार दि. 6 डिसेंबर रोजी वाघळी येथील राहत्या घरी होणार असल्याचे कदम कुटुंबियांकडून सांगण्यात आले आहे.