मतदार यादीतून नाव गायब, अनेकजण मतदानापासून वंचित

| उरण | वार्ताहर |

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उरण विधानसभा निवडणुकीत अनेक मतदारांची नावे मतदारयादीत नसल्याने त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागले.

कोणत्याही निवडणुका जाहीर झाल्यानंतर महिना दीड महिना आधी मतदार याद्या प्रसिद्ध होत असतात. त्या मतदार याद्या राजकीय पक्षाचे पदाधिकारी घेऊन नावांची तपासणी करतात. मग उरण विधानसभा मतदार संघातील उरणमधील काँगेस पक्षाचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अकलाख शिलोत्री, उरण शहर उपाध्यक्ष गुफारण तुंगेकर यांच्यासह जवळपास 150 ते 200 मतदारांची नावे मतदार यादीत नसल्याचे उघड झाल्याने ते मतदानापासून वंचित राहिले आहेत.

Exit mobile version